नवीन मराठी सिनेमा तुमच्या भेटीला... "खविस"! | A New Marathi Film is Coming Your Way… “Khavis”!

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवनवीन विषय हाताळले जात आहेत आणि त्यातच एक नाव आता चर्चेत आहे –

"खविस"!"कॉलेज डायरी" नंतर दिग्दर्शक अनिकेत घाडगे यांचा हा नवा सस्पेन्स थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाचा पोस्टर लवकरच प्रदर्शित होणार असून, या पोस्टरवरून "खविस" हा सिनेमा सस्पेन्स थ्रिलर  किंवा Horror सिनेमा  असण्याची शक्यता आहे.


Khavis Marathi Movie, Aniket Ghadage, New Marathi Movie, Marathi Movie, 16 May 2025, Khavis , खविस चित्रपट, अनिकेत घाडगे दिग्दर्शित मराठी हॉरर सिनेमा, Marathi horror film teaser

कलाकार आणि निर्मितीसंघ

  • 🎬 दिग्दर्शक आणि लेखक: अनिकेत जगन्नाथ घाडगे

  • 🏢 प्रॉडक्शन हाऊस: मधुरा प्रोडक्शन हाऊस

  • 👨‍💼 निर्माते: शशांक विनोद माथुरवाला, विष्णू घोरपडे 

  • 👥 सह-निर्माते: अमोल घोडके, श्रीनिवास कुलकर्णी, प्रदीप लडकत 

"खविस" म्हणजे काय?

"खविस" हा शब्द मराठी लोककथा व समजुतींमध्ये एक भयावह आत्मा, भूत किंवा वाईट शक्ती दर्शवण्यासाठी वापरला जातो. तो एखाद्या जागेवर वास करत असतो आणि लोकांना त्रास देतो, अशी लोकमान्यता आहे.

🎥 चित्रपटाचे वैशिष्ट्य

  • कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रीकरण

  • थरारक आणि नव्या धाटणीचा विषय

  • प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी कथा

दिग्दर्शक अनिकेत घाडगे यांनी या चित्रपटात मराठीत प्रथमच काही वेगळे प्रयोग केले आहेत, आणि प्रेक्षकांना ते नक्कीच भावतील, असा त्यांचा विश्वास आहे.


📅 प्रदर्शनाची तारीख

१६ मे २०२५ रोजी "खविस" तुमच्याजवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे!