मैत्री म्हणजे काय? | what is friendship?

 मैत्री म्हणजे काय?


what is true friendship in marathi ,what is meaning of friendship in marathi ,what is the friendship in marathi,what is friendship essay ,what is friendship all about ,what is friendship about


सोडा हो. व्याख्या काय करायच्याहेत?

खरंतर व्याख्येत बसतं, ते नातं नसतंच कधी. 


रोजरोज भेटतात, रोज एकमेकांशी बोलतात तेच खरे मित्र मैत्रीण असतात, असं असतं का? 


किंवा ते खरंच एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण असतात का? 


नाही.


मैत्रीला जात नसते, वेळ नसते, वय नसतं, अट नसते आणि रूपही नसतं.


प्रेमाच्या कित्येक पुढे गेलेलं नातं म्हणजे मैत्री.


मैत्री म्हणजे असं नातं जे मांडणं शब्दांच्या कुवतीचं काम नसतं.


समोरच्याचा त्याच्या गुणदोषासकट स्वीकार म्हणजे मैत्री.


जगाने आपल्या मित्राला खूप मान द्यावा अशी अपेक्षा नसते, पण त्याचा केलेला अपमान आपल्याला सहन होत नाही, तिथे असते मैत्री.


जिथे मनातलं बोलताना समोरच्याला आपण गमावू अशी भीती नसते, तिथे असते मैत्री.


हाताची हातावरली टाळी म्हणजे मैत्री, प्रेमाने केलेली शिवीगाळ म्हणजे मैत्री.


राड्यानंतर गच्चीवरची मिटिंग म्हणजे मैत्री,

टपरीवरची वाटून घेतलेली कटिंग म्हणजे मैत्री.


मैत्री म्हणजे जगासाठी अदृश्य पण दोघांच्याही मनात ठळक असलेलं खोल नातं.


जिथे देणंही हक्काचं असतं अन घेणंही हक्काचं असतं. ते नातं म्हणजे मैत्री.


ही मैत्री कुठे सापडते हो?


आयुष्याच्या टप्प्यावर अशी मैत्री कुठेही सापडू शकते.


कधी आईवडिलांत, कधी मुलांत, कधी बायकोत, कधी नवऱ्यात तर कधी अनोळखी माणसात.


*तुमचंही आयुष्य अश्याच मित्र-मैत्रिणींनी भरलेलं असू दे.


Related keywords ; what is true friendship in marathi ,what is meaning of friendship in marathi ,what is the friendship in marathi,what is friendship essay ,what is friendship all about ,what is friendship about