True Motivational Story Of Three Friends | तीन मित्रांची प्रेरणादायी गोष्ट | Best Marathi Motivational Story

तीन मित्रांची प्रेरणादायी गोष्ट

marathi motivational stories for students pratilipi marathi motivational stories marathi motivational short story marathi inspirational stories marathi motivational short stories marathi inspirational stories for students motivational stories in marathi for students pdf motivational stories in marathi pdf free download motivational stories in marathi video motivational stories in marathi motivational stories in marathi pdf motivational stories in marathi for students


तीन मित्रांची गोष्ट आहे. लहानपणापासुन एकमेकांचे पक्के दोस्त. 


पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधिही न सोडणारा. प्रत्येक गोष्टीत अव्वल. 


दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वागैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा. आणि... 


तिसरा मित्र,अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. 


पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त. पुढे शाळा संपली. 


हुशार मित्र जो होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे Indian Engineering Services परिक्षा दिली आणि Class 1 अधिकारी पदी त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला. 


दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पुर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत प्रयत्न करायचा होता. IAS ची परिक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधिकारी होता त्या खात्याचा सर्वोच्च म्हणजे सचिव झाला.


तिसरा मित्र, तर शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणाच्या वगैरे जास्त भानगडीत पडला नाही. पुढे त्याने योग्य वेळी, योग्य पक्षाकडून निवडणूक लढवली, खासदार झाला. आणि नंतर तर पहिले २ मित्र ज्या खात्यात अधिकारी होते त्या खात्याचा कॅबिनेट मिनिस्टर झाला.


ही काही काल्पनिक गोष्ट नाही. सत्य कथा आहे.


पहिला मित्र, अतिशय हुशार, तो म्हणजे, कोकण रेल्वेचे शिल्पकार, E.Radhakrishnan.त्यांना Metro Man, म्हणुनही संबोधतात. दिल्ली मेट्रोचे ते CEO होते. 

Marathi real Motivational Story,तीन मित्रांची प्रेरणादायी गोष्ट


दुसरा मित्र म्हणजे, T. N. Sheshan. अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय IAS Officer. भारतीय निवडणुक आयोगाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अाणि 

T,N Sheshan, Motivational Story,Marathi Motivational Story


तिसरा मित्र म्हणजे, K. P. Unnikrishnan.लोकसभेवर सलग ५ वेळा निवडून गेले. पंतप्रधान V.P.Singh यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. 

Marathi Motivational Story, Motivational Story


तात्पर्य

शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी काही माध्यमं आहेत, उद्दिष्ट नाहीत. उद्दिष्ट तर खुप मोठी असावीत. आपल्या मुलांना ह्या माध्यामांचे गुलाम होऊ देऊ नका. त्यांना त्यांची उद्दिष्ट उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.