वडिल आणि मुलगा | Marathi Moral Story

 वडिल आणि मुलगा

वडिल आणि मुलगा | Marathi Moral Story



एक तरुण पिता आपल्या लहान मुलास घेऊन बसला होता. . थोडया वेळाने एक कावळा त्याच्या समोरील घराच्या छपरावर बसला होता. मुलाने वडिलांना विचारले, "हे काय आहे? -


वडिल म्हणाले, कावळा आहे. परत विचारले, "हे काय आहे? वडिल परत म्हणाले हा कावळा आहे."


मुलगा सारखा विचारीत होता की हे काय आहे. वडिल त्याला प्रेमाने प्रत्येक वेळी सांगत गेले की हा कावळा आहे.


काही वर्षानंतर मुलगा मोठा झाला आणि वडिल म्हातारे झाले. एक  दिवस वडील चटईवर बसले होते. घरात मुलाला भेटायला कुणीतरी आले त्यावेळी वडिलांनी त्याला विचारले, "कोण आले आहे?"


मुलाने नांव सांगितले. थोड्या वेळा नंतर दुसरे काही जण आले आणि वडिलांनी परत विचारले. यावेळी मुलगा म्हणाला, "तुम्हाला काय


करायचे आहे कोण आले, कोण गेले, हे सारखे का बडबडत असतात.


वडिलांनी मोठा श्वास घेतला. हातात डोके पकडले मोठयाने दुःखाने हळूहळू बोलू लागले. "मी कधीही तुला झिडकारले नाही. प्रत्येक वेळी तुला सांगत गेलो की कावळा आहे. आपल्या आई वडिलांचा तिरस्कार करणारी मुले वाईट समजली जातात. तुम्ही नेहमी ही गोष्टी लक्षात ठेवावी आई वडिलांनी तुमचे पालन पोषण कष्ट करून केले आणि तुम्हाला प्रेम दिले.