दुर्बलतेचे पाप
लांडगा नदीच्या किनारी पाणी पित होता. त्यावेळी त्याने खाली पहिले की एक मेंढीचे पिल्लू पाणी पित होते. त्याला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो म्हणाला "काय रे पाणी का उष्टे करतो. पहात नाही का मी पाणी पितो".
मेंढीचे पिल्लू म्हणाले, "काका! तुम्ही तर वरती पाणी पितात तुमचे उष्टे पाणी वाहत येते. ते मी पित आहे. लांडगा पिल्लाशी भांडण्याचा बहाणा न करता म्हणाला, "तर तू तर वर्षभर मला शिव्या देतोस ?"
मेंढीचे पिल्लू लगेच म्हणाले, "काका! माझे आयुष्यच मुळी मुश्कीलेने सहा महिन्याचे असते. तर तुम्हाला मी वर्षभर शिवी कशी देईन. लांडगा चिडून बोलला, "अरे तुझी आई दोन मैलावरून काल मला चिडवत होती ?. मेंढीचे पिल्लू म्हणाले, "काका ! तिला तर मरुन एक महिना झाला. मग दोन मैलावरून तुम्हाला काल कसे चिडवले ?"
लांडग्याने पाहिले की मेंढीचे पिल्लू फारच हुशार आहे. कोणतीही गोष्ट मानायला तयार होत नाही. म्हणून तो चिडून म्हणाला काय रे मुला तू दुरून माझ्याशी का सामना करत आहेस. असे सांगून त्याला मारून टाकले.
त्यावेळी झाडावर बसलेली मैना कावळ्याला म्हणाली "निर्बलाने कितीही सभ्यता पूर्वक आणि खरे सांगितले तरी सबल त्यांना सुरक्षित ठेवत नाही. मेंढी जोपर्यंत जन्मास येते तोपर्यंत लांडगेही जन्मास येतात
Realated Searches:Marathi Moral Stories Short, Marathi Moral Stories Pdf, Marathi Moral Stories for Read, Marathi Short Stories With Moral Values, Best Marathi Moral Stories, Marathi Moral Short Stories, Moral Stories in Marathi Language
