व्यथा शेतकर्याची …..😔
कालच शेजारच्या सदुकाकानं कर्जाला वैतागुन गळफास घेतला म्हणे...
सदुकाकाची लहानलहान लेकरं एकटी पडली.. ढसाढसा रडली .
हे सगळं बघीतलं आपल्या गण्यानं ..
तेव्हापासुन गण्या पोटभर जेवतही नाही .
आपल्याही शेतकरी बापाच्या मनात असा विचार आला तर याचाच विचार असतो हा छोटासा गण्या ..
या गण्यानी घरातल्या सगळ्या दोरया , रस्सी लपवून ठेवल्या , बापाच्या नजरेला पडु नये म्हणुन..
पलीकडच्या शेतात त्या गाडुन ठेवल्या ..
रातभर बी याच विचारात असतोया गण्या , बाप झोपलायं ना हे तपासायला चारदा उठतो गण्या , बापाला मिठीत घालुन निजतो गण्या ...
फवारणी करायले जाताना औषधची बाटली स्वतः घेवुन चालतो हा गण्या , पुर्ण औषध फवारेपर्यंत बापाच्या पाठीमागे अनवाणी फिरतो गण्या ..
लई हुशार झालायं गण्या ,
सातवीतला हा गण्या, वयात येण्याआधीच शहाणं झालयं .. बहुतेक आत्महत्या म्हणजे काय ते त्याले समजायले लागलंय
एवढुसा गण्या आजकाल बांदाबांदानं बापाच्या पाठीमागे पळत असतो,
बापाच्या मुखाकडे पाहत आतल्याआत रडत असतो ,
उन्हातान्हात गण्या बापाबरोबरच वावरत असतो ,
उन्हाच्या चटक्यान नाही तर बा च्या काळजीन गण्या तळमळत असतो..
चड्डीवर मोठी दोन ठिगळ जोडलं गण्यानं ..
तरीही नव्या चड्डीच नाव नाही काढलं गण्यानं..
गण्या शाळेला फाटकाच सदरा घालुन जातो ..
मायंनं दिलेली चतकुर भाकर हसत हसत खातो .
चप्पल तुटलीयं गण्याची , अनवाणी पायानं बा ला मदत करत असतो ,
पायात मुडलेल्या काट्यात त्याले बापाचा चेहरा दिसत असतो ...
पुन्हा शेतकर्या घरी जन्म घ्यायला हवा ..
गण्या सारखं प्रत्येक शेतकर्याच्या लेकराला वाटतं आपला बाप जगायला हवा ..😔😔
हा गण्या उभा दिसतो प्रत्येक शेताच्या बांदाबांदावर , अन् देशाच्या घराघरात .
हा गण्या दिसतो प्रत्येक शेतकर्याच्या दारादारात ..
😔😔😔
लेखक अज्ञात आहे....
