क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन
*१. आपली उद्दिष्टे ओळखा*
प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करणे हे प्रत्येक संघाचे उद्दिष्ट असते . अशा प्रकारच्या सामन्यासाठी स्वतःची तयारी करताना हेच जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते की तुमचा प्रतिस्पर्धी नक्की कोण आहे . तयारीचा पहिला नियम हाच आहे , की तुमच्या प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी न लेखणे .
*२.*लवकरात लवकर एक चांगली सुरुवात करणे .*
कोणत्याही सामन्यामध्ये जर सुरुवात चांगली मिळाली , तर संघाला ठरवलेली उद्दिष्टे प्राप्त करणे सोपे जाते .
उदाहरणार्थ , दुसऱ्यांदा फलंदाजी करताना जर तुम्हाला खूप मोठी धावसंख्या साधायची असेल , तर , सुरुवातीला येणाऱ्या फलंदाजांकडून सहाजिकच खूप मोठ्या धावसंख्येचे अपेक्षा केली जाते . त्यामध्ये चौकार असतील , षटकार असतील.
जेणेकरून नंतर येणाऱ्या फलंदाजांवरचा ताण कमी होतो व सहजतेने उद्दिष्ट प्राप्त करता येते . त्याचप्रकारे , एक गुंतवणूकदार म्हणून विचार करताना , लवकरात लवकर काही ठराविक रकमेची गुंतवणूक करणे हे कधीही शहाणपणाचे ठरते .
लवकरात लवकर जर तुम्हाला अगदी छोटीशी ही रक्कम गुंतवता आली आणि हळूहळू ही रक्कम वाढवत नेता आली , तर , भविष्यात तुम्ही खूप मोठी गंगाजळी उत्पन्न करू शकता . उलटपक्षी , जेवढ्या उशिराने तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात कराल , त्याच प्रमाणामध्ये ती ठराविक रक्कम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अधिकची गुंतवणूक करावी लागेल , नाहीतर , आपल्याला ठरावीक मुदतीमध्ये अपेक्षित रक्कम प्राप्त करता येणार नाही
*३. सुरक्षा कवच*
सुरक्षा साधने किंवा सुरक्षा कवचात शिवाय खेळायला उतरू नका. सुरक्षेची योग्य ती खबरदारी न घेण्याने खेळताना खेळाडूला इजा होऊ शकते . त्याचप्रकारे तुमच्या आर्थिक नियोजनात मध्ये जर सुरक्षेचा मुद्दा विचारात घेतला नसेल , तर , अनेक धोक्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो. संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी आर्थिक आणि आरोग्याशी निगडीत धोक्यांचा सामना करता येईल अशाप्रकारे स्वतःची आर्थिक तयारी करूनच मग सुरुवात करणे कधीही योग्य अडीअडचणीच्या आणि आपत्कालीन स्थितीमध्ये लगेच हाताशी येईल आणि सुरक्षित असेल अशा प्रकारे आर्थिक नियोजन किंवा एक ठराविक रक्कम बाजूला ठेवूनच गुंतवणुकीचा विचार करणे फायद्याचे आहे.
*४. योग्य संघाची निवड*
क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे . त्यामध्ये खेळणाऱ्या अकरा पैकी प्रत्येक खेळाडूचे योगदान हे विजयासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. एखाद्या सामन्यामध्ये एखादा खेळाडू सामना फिरवू शकतो , पण नेहमी असे होत नाही. विजय प्राप्तीसाठी सर्वच्या सर्व अकरा खेळाडूंचे योगदान अतिशय महत्त्वाचे असते.
*५. खूप जास्त वेळेसाठी टिकून रहा .*
कोणताही महत्वाचा सामना खेळताना उत्तेजीत होऊन कसेही वेडेवाकडे फटके मारणे किंवा दडपणाखाली येऊन खेळणे हे प्रत्येक फलंदाजासाठी नुकसानीचेच ठरते. त्याचप्रमाणे गुंतवणूक करण्यासाठी ज्याला लवकरात लवकर खूप जास्त पैसे मिळवायची घाई आहे किंवा असले तरी दडपण आहे असे लोक बर् याचदा शेअर बाजाराच्या दोलायमान स्थिती चा अभ्यास न करता अचानक त्यातून बाहेर पडतात आणि खूप मोठे नुकसान करून घेतात.
