व्यवसाय करत असताना छत्रपती शिवरायांकडून काय शिकाल? | vyavsay karat astana maharajankadun kay shikal ?

 ✳️ *व्यवसाय करत असताना छत्रपती शिवरायांकडून काय शिकाल?*✳️



🎯 *सुरवात करण्यावर भर दया, कमरतेवर लक्ष दे ऊ नका.*

       रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबानं सोबत फक्त ८-१० मावळे होते.


🎯 *यशाचा, वय, अनुभवाचा संबंध नसतो.*

       महाराजांनी तोरणागड वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते.


🎯 *स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं.*

       मुघल, निझाम, आदिलशाह असे कसलेले विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापले होते. 


🎯 *सहकारी चांगले निवडा.*

  आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असे म्हणत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची   ताकत होती.


🎯 *संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा.*

       अफझलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते, शांत राहून प्रत्येक निर्णय आमलात आणला होता.


🎯 *नियोजनबद्ध काम करा, अंमलबजावणी योग्य प्रकारे करा.*

       पुण्याला वेढा घालून बसलेल्या शाहिस्तेखानाला अतिशय नियोजनबद्धरीतीने पराभूत केले.


🎯 *संकटकाळी धीर सोडू नका, शांतपणे निर्णय घ्या.*

     पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले.


🎯 *सगळं संपलंय असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा.*

  पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज संपलं असंच सगळ्यांना वाटलं होतं.... महाराज सोडून.


🎯 *स्वाभिमानी रहा, आत्मसन्मान आवश्यक आहे.*

आग्ऱ्यात औरंगजेबासमोर त्यांच्याच दरबारात आपल्या अपमानाविरोधात बोलण्याची हिंमत महाराजांनी दाखवली होती.


🎯 *नैतिकतेने, नियमाने वागा, सहकार्यांनाही शिस्त लावा.*

महाराजांचे नियम स्वतः महाराज सुद्धा मोडत नसत. अगदी जवळच्या सहकार्यांना सुद्धा नियमभंगाच्या शिक्षेत माफी नसे.


🎯 *स्वतःचे अस्तित्व दाखवण्यात कोणतीही कसर ठेवू नका.*

 राज्याभिषेक फक्त जनतेसाठी नव्हता तर देशातील तमाम अन्यायकारी शाह्यांना कल्याणकारी स्वराज्याचे अस्तित्व दिमाखात दाखवण्यासाठी होता.


🎯 *जबाबदारीचे वाटप करा.*

 महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना, तसेच इतरवेळी जबाबदारीचे वाटप करून ठेवत, त्यामुळे कामात सुसूत्रता राही.


🎯 *शांतपणे निर्णय घ्या.*

 कोणताही निर्णय घेताना महाराज घाईगडबड करत नसत, शांत राहून पूर्ण विचार करून मगच योग्य निर्णयाप्रत येत.


🎯 *वेळप्रसंगी कठोर निर्णय घेताना कचरू नका.*

स्वराज्य हितासाठी महाराजांनी अनेक कठोर आणि कटू निर्णय घेतले, वेळप्रसंगी आपल्या आप्तेष्टांविरोधात सुद्धा निर्णय घेताना डगमगले नाहीत.


🎯 *लोकांना आपलेसे करा.*

   लोकांशी फटकून वागून तुम्ही प्रगती करू शकत नाही. महाराज जनतेसोबत वागताना कोणतेही अंतर न ठेवता अगदी त्यांच्यातले होऊन जात, अगदी घरातील सदस्य असल्यासारखे.


🎯 *वचक असायलाच हवा.*

 महाराजांच्या परस्पर कोणताही निर्णय घेण्याची हिम्मत कुणातही नसे, महाराजांनी ठरवून दिलेल्या नियमांबाहेर कुणीही जात नसे. यामुळे कामावर योग्य अंकुश राही.


🎯 *क्षमाशील असा.*

महाराज जितके कठोर होते तेवढे दयाळू आणि क्षमाशीलही होते. महाराजांच्या या स्वभावामुळे कित्येक विरोधक सुद्धा त्यांचे सहकारी बनले होते.


🎯 *मनाचा ठाव घ्या.*

 समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे हे महाराजांना चांगलं समजायचं. त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीला तात्काळ आपल्याबाजूने वळवण्यात यशस्वी होत.


🎯 *माघार घेणे सुद्धा काहीवेळेस आवश्यक असते.*

महाराज कित्येक वेळा परस्थिती पाहून माघार घेत. त्यामुळे होणारे नुकसान टळत, आणि पुन्हा तयारी करण्याची संधी मिळे. यात कोणताही कमीपणा नाही!


🎯 *युद्धात हराल किंवा जिंकाल पण तहात हरू नका.*

महाराजांनी प्रत्येक वेळी फक्त लढाई जिंकण्यालाच महत्व दिले नाही तर तहात जिंकणे महाराजांसाठी महत्वाचे असे. युद्धाचा अंतिम परिणाम तहच असतो.


*महाराजांचा आदर्श जीवनात ठेवा,*

*नक्कीच यशस्वी व्हाल....*


*🙏🙏🙏🙏*

हे मी लिहिलेल नाही , आवडल , म्हनून टाकल.