शिवा कशिद आणि महाराज | Shiva Kashid Aani Maharaj

 

शिवा कशिद  आणि महाराज 


सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होते तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात 
पाणी आलं. तेव्हा शिवा काशीद यांनी महाराजांना 
विचारलं,
"महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू?"
तेव्हा महाराज म्हणाले
"शिवा तू हा पोशाख परीधान
केला आहेस.
याचं
बक्षीस काय मिळणार   माहीत आहे तुला?"
शिवा काशिद म्हणाले,
" होय राजे मला माहीत
आहे, शत्रूच्या वेढ्यात
गेल्यावर शत्रू मला खतम करणार आहे, पण
शत्रू मला मारताना शिवा काशिद म्हणून मला मारणार नाही, तर शिवाजी महाराज म्हणून मला मरायची संधी मिळत्येय राजे.
ही संधी सोडीन मी ??? "
*सात जन्माची पुण्याई म्हणून शिवाजी महाराज म्हणून_मरतोय ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय*.🙏🚩
किती सामर्थ्य आणि त्याग
होता शिवा काशिद यांच्या बोलण्यात,
एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩