पु.ल. देशपांडे यांचे विचार | Pu la Deshpande Quotes in Marathi

पु.ल. देशपांडे यांचे विचार 




जुन्यात आपण रंगतो... स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!” -  पु.ल. देशपांडे

शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच. -  पु.ल. देशपांडे

प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे -  पु.ल. देशपांडे

परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!. -  पु.ल. देशपांडे

माणसाचे “केस गेलेले” असले तरी चालतील….  पण…. माणुस हा “गेलेली केस” असु नये…… -  पु.ल. देशपांडे

जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते. -  पु.ल. देशपांडे

माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे… -  पु.ल. देशपांडे

आयुष्य फार सुंदर आहे… ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे… -  पु.ल. देशपांडे

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. -  पु.ल. देशपांडे

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.  पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं.  या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो. -  पु.ल. देशपांडे

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते. -  पु.ल. देशपांडे

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण. -  पु.ल. देशपांडे

 खरं तर सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते. -  पु.ल. देशपांडे

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो. -  पु.ल. देशपांडे

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे. -  पु.ल. देशपांडे

सगळे वार परतवता येतील पण  अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही -  पु.ल. देशपांडे

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे. -  पु.ल. देशपांडे

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं. -  पु.ल. देशपांडे

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.  ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. -  पु.ल. देशपांडे