आपलं आरोग्य आपल्या हातात. | Aapla aayushya aaplya hatat

 आपलं आरोग्य आपल्या हातात.



१. आपण 20 रुपये किलो टोमॅटो घेऊन त्याची चटणी खाऊ शकतो ,

 पण ते न करता आपण 150 रुपये किलो टोमॅटो souce खातो ते ही 1/2 महिने आधी बनवलेले शिळं.


२. घरी आपण आज सकाळी भरलेलं पाणी दुसऱ्यादिवशी पीत नाही, 

पण 3 महिने जुनी बॉटल मधील पाणी 20 रुपये देऊन पितो.


३.50 रु लिटर दुध आपल्याला महाग वाटत, 


पण 70रु लिटर च कोल्ड ड्रिंक तेही 2ते 3 महिने जुन आपण पितो.


४. आपल्या शरीराला ताकद देणारे 200 रु पाव कीलो मिळणारे ड्राय फ्रुट्स आपल्याला महाग वाटतात, 


पण 400 रु ला मिळणार मैद्यापासून बनलेला पिझ्झा आवडीने खातो.


५. बहुतेक जण सकाळी घरात शिजवलेलं अन्न संध्याकाळी खात नाहीत, 


पण काही कंपनी चे सहा सहा महिने जून असलेलं खाद्यपदार्थ आपण खातो, जेव्हा की आपल्याला माहीत असते हे खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी प्रिजर्वेटिव मिक्स करतात जे आपल्या आरोग्यास घातक असतात.


६.ह्या 2 महिन्यांच्या lockdown च्या काळात आपल्याला चांगल समझलेलं आहे की बाहेरच्या जंक फूड, किंवा हॉटेलमधील खाण्याशिवाय आपण छान जगू शकतो , घरातील शुद्ध , सकस अन्न खाऊ शकतो


 ज्याने आपले आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.

  

आठवून बघा ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा आजारी पडलात. नाही ना ,


साधी सर्दी, खोकला तरी झाला का ते पहा.