डेली मराठी कोट्स
जशी शरीराला रोज चांगल्या अन्नाची गरज असते.
तशीच आपल्या मनालाही दररोज सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज असते.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
दररोज सकाळी स्वतःला एक गोष्ट सांगा.
'I Believe In Me'
आणि करा कामाची सुरुवात,
पुर्ण दिवस उत्साहात जाईल.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो,
कारण त्या काळात जे शिकायला मिळतं, ति शिदोरी आयुष्यभर पुरते.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
ज्या देशात वाचनाचे जेवढे प्रमाण जास्त असते तो देश तेवढाच प्रगती करताना दिसतो उदाहरण जपान, जर्मनी, अमेरिका ब्रिटन फ्रान्स, स्पेन,इस्राएल.आणि ज्या देशात वाचनाचे प्रमाण अगदी कमी त्याच देशात प्रगती विकास यांचा दुष्काळ दिसतो.विमानातील प्रवाशी वाचन करतात तर ट्रेन बस मधील प्रवाशी मनोरंजन,निरर्थक गप्पा गोष्टी करताना दिसतात. वाचन प्रगती,श्रीमंती, विकास, आणि विचारातील प्रगल्भता यांचा हा असा जवळचा संबंध आहे.वाचन करणारे युक्तीने काम स्मार्ट वर्क,करतात तर वाचन टाळणारे कष्टाची कामे,हार्ड वर्क करतात. ज्यांना हे रहस्य कळले ते वाचनाची सवय लावून श्रीमंत झाले.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांना ही असतो....
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा, कारणं देण्यावर जे लोकं भर देत असतात.
अशी लोकं उद्योग/व्यवसायात यशस्वी होत नसतात.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते....!
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
पैसा माणसाचं राहणीमान बदलू शकतो.
पण बुद्धि, नियत आणि नशीब कधीच बदलू शकत नाही.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
लक्ष साध्य करण्यासाठी चांगले विचार असून उपयोग नाही.
तर, त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणंही महत्त्वाचे आहे.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही... अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... कारण... छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण... अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....!
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका...कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे....
पण मन जर शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही...!
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा.
कारण गरज संपली जाते, पण सवयी कधीच सुटत नाहीत.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....!
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
आपण आपली सुरुवातच जर जिंकायच्या उद्देशाने केली, तर हरायचा प्रश्नच उरत नाही...
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
यशस्वी होण्यामागे कोणतेही रहस्य वगैरे नसते.
योग्य नियोजन, प्रचंड कष्ट
आणि
अपयशातून शिकण्याची वृत्ती यातूनच ते साध्य होत असते.
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
फक्त प्रामाणिक पणे
आपले काम करत रहा...
एक दिवस नक्की, तुमचा अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी
तुमच्या नावाचा वापर करतील..!!
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
जसे शेतात बी पेरले नाही तर, ती जागा गवताने भरली जाते,
तसेच जर डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत
तर ती जागा नकारात्मक विचार घेतात
🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌻🌺🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼🌺🌻🌼
Marathi Motivation Quotes, Marathi Quotes, Marathi Daily Quotes, Marathi Daily Motivation
