आम्ही घेउन आलो आहोत कोडी आपल्या मराठी भाषेत
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१] एक जन वाढायला 12 जण जेवायला.
उत्तर : घड्याळ
२] गावभर हिंडतो पण देवळात जायला घाबरतो, ओळखा पाहु मी कोण?
उत्तर: चप्पल
३] मी तुमच्या शरिराचा एक भाग आहे, तुम्ही मला तुमच्या डाव्या हातात पकडु शकता, पण उजव्या हातात नाही, ओळखा पाहु मी कोण?
उत्तर: उजवा कोपरा
४] एकदा का बापाने मुलाल एक वस्तु दिली आणि सांगितले भुक लागली तर खा,तहान लागली तर पी आणि थंडी वाजली तर जाळ , ती वस्तु कोणती?
उत्तर: नारळ
५] वेडा नाही पण कागद फाडतो,पोलिस नाही पण खाकी कपडे घालतो,देऊळ नाही पण घंटा वाजवतो, ओळखा मी कोण?
उत्तर:वाहक [ कंडक्टर ]
नविन नविन मराठी जोक्स आणि कोडी साठी आमच्या पेज ला सब्सक्राइब करा.
