मराठी उखाणे | Marathi ukhane for Male/ Female

खास खास निवडक मराठी उखाणे  फ़क्त तुमच्यासाठी 





 नाव घे नाव घे आग्रह असतो सगळ्यांचा

.....चं नाव नेहमीच असतं ओठांवर

प्रश्न असतो उखाण्याचा

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


मंगळसूत्र ,हिरवी कांकणं चढला सौभाग्याचा साज

.......ची गृहलक्ष्मी म्हणून गृहप्रवेश करते आज

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे 

__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


उगवला सूर्य , झाली पहाट

मी नटून तयार झाले की

------राव मला बसतात पाहत

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


सुराविना कळला साज संगीता चा

----- च्या नावात गवसला अर्थ जीवनाचा

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


शुक्र चांदनी सारखा एकदाच घ्यावा निरखून

----- सारखा हीरा एकदाच घेतला पारखून

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


मिळून कामे केली की होतात लवकर

मी चीरते भाजी ----- लावतो कुकर

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆