Marathi Mhani | मराठी म्हणी

मराठी म्हणी 


१ . अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.

२ . अंगापेक्षा बोंगा जास्ती. 

३ . अंगाला  सुटली  खाज, हाताला  नाही लाज.

४ . अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.

५ . अंगावरिे लेणे जन्मभर देणे.

.६ . अंथरून  पाहून पाय पसरावेत.

 ७ . अंधळं दळतं अऩ कुत्र पीठ खातं.

 ८ . अंधाळया चा हात  बडुकुल्यात.

 ९ . अंधारात केले नी  उजेडात आले. 

१० . अंधेर नगरी चौपट राजा.


११ . अकिति आणि सणाची  निचिती.

१२ . अक्कल खाती जमा. 

१३  . अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल. 

१४ . अक्कल नाही काडीची   नाव सहस्त्रबुद्धे .  

१५ . अक्कल नाही काडीची   म्हणे  बाबा माझे लग्नं करा. 

१६ . अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

१७ . अग माझे बायले, सर्व  तुला वाहिले .

१८. अघटित वार्ता कोल्हे गेले तीर्था.

१९.अघळ पघळ अन घाल गोंधळ.

२०.अठरा विश्दाव दारिद्र्य त्याला   छत्तीस कोटी उपाय