अकबर आणि बीरबल च्या गोष्टी
मेनाचा वाघ
थंडीचा महिना चालू होता. अकबराचा दरबार नेहमी प्रमाने गच्च भरला होता. त्या दरबारामध्ये शेजारच्याच राज्यातल्या राजाने पाठवलेला एक सेवकही हाजिर होता.
त्या राजाने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी त्याच्या सेवकाजवळ एक मेना पासून बनवलेला वाघ एका पिंजरा मध्ये बंद करून पाठवला होता आणि त्या राजाने असे सांगण्यात आले होते की पिंजरा न खोलता या वाघाला बाहेर काढून दाखवा.
त्या दिवशी दरबारामध्ये बीरबल नसल्यामुळे अकबर विचारात करत होता की या समस्यांमधून मार्ग कसा काढावा. जर आपण या वाघाला बाहेर काढले नाही तर सर्व लोक आणि बाकीचे राज्यतले राजे आपल्यावर हसतील. एवढ्यात बुद्धिमान चतुर आणि हुशार बिरबल दरबारामध्ये येऊन सर्व सूत्रे आपल्या हाती घेतो.
बीरबल ने थोडा विचार केला आणि,तेव्हा बिरबलाने एक गरम सळई मागवली आणि ती पिंजऱ्यामध्ये घालून तो मेना पासून बनवलेला वाघ वितळविला. पाहता पाहता मेन वितळून बाहेर येऊ लागले. अकबर-बिरबलाच्या कल्पनेवर खूप प्रसन्न झाला आणि पुन्हा त्या राजाने अकबराला आव्हान दिले नाही.
बोध :आपण बुद्धीच्या जोरावर कितीही मोठ्या समस्येवर मात करू शकतो.
Marathi akbar Birbal Moral stories | Marathi Stories | Marathi Lekh
जर तुम्हाला देखिल तुमचे साहित्य वेब साईट वर प्रदर्शोत करायचे असेल टार आम्हाला ईमेल द्वारे संपर्क करा.
