भारताचे सर्व प्रधानमंत्री | India's All Prime minister

 भारताचे सर्व  प्रधानमंत्री


भारताचा पंतप्रधान हा भारत देशामधील केंद्रीय सरकारचा प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार आहे. पंतप्रधान भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे.


पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते.


नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.


- मूळ


भारताला १९४७ साली [ ब्रिटिश भारत ]ब्रिटिश राजवटीपासून भारताचा स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने युनायटेड किंग्डम ब्रिटनमधील संसदीय प्रजासत्ताक ह्या प्रकारच्या सरकारचे अंगीकरण केले. ह्यामध्ये राष्ट्रप्रमुखाला केवळ औपचारिक अधिकार असून बव्ह्ंशी महत्त्वाचे निर्णय पंतप्रधानाद्वारे घेतले जातात.


- नियुक्ती


भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. सरकार स्थापन केल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणे बंधनकारक आहे. ह्यासाठी सरकार स्थापन करणारा पक्ष इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ शकतो.


- पात्रता


भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.


भारत देशाचे नागरिकत्व


लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला ६ महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावे लागते.


लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय २५ वर्षे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय ३० वर्षे.


केंद्रीय सरकार, राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयामध्ये फायदा असलेल्या पदावर नसणे.


- यादी


1. जवाहरलाल नेहरू


2. लाल बहादूर शास्त्री


3. इंदिरा गांधी


4. मोरारजी देसाई


5. चरण सिंग


6. इंदिरा गांधी


7. राजीव गांधी


8. व्ही.पी. सिंग


9. चंद्रशेखर


10. पी.व्ही. नरसिंह राव


11. अटल बिहारी वाजपेयी


12. एच.डी. देवेगौडा


13. इंद्रकुमार गुजराल


14. अटल बिहारी वाजपेयी


15. मनमोहन सिंग


16. नरेंद्र मोदी