घुसमट | Ghusmat | मराठी कथा |Marathi कथा

घुसमट

सोहम पाटिल


 

जोरात पेपर दरवाजाला लागून जमिनीवर पडला. त्याच्या आवाजाने मी जागा झालो रागानेच दरवाजा उघडला आणि त्या पेपर टाकणाऱ्या पोरावर शिव्यांचा अमृत वर्षाव च केला

"अबे भोसडी के जब पेपर डालना नही आता तो क्यों करते हो बे काम.लोगों की निंदे हराम कर रखी है सालोंने"

 तो " सॉरी सॉरी"  म्हणू लागला .

आपल्या रागावर ताबा मिळवत मी " आगे से याद रखना" एवढच म्हणालो . 

पेपर उचलला तर गेट वर एक छान मांजर बसल होत.

दुधाची अपेक्षा असावी कदाचित. खिशाला हात लावला पाकीट आहे याची जाणीव झाली . तसाच पेपर हातात घेऊन दुधाची पिशवी घ्यायला बाहेर पडलो. डोकं जड झाल होत. डोळे सुजल्या सारखे वाटत होते.लोकांच्या माझ्या कडे पाहणाऱ्या नाजरांवरून मी अंदाज बांधू शकत होतो की नक्कीच माझा अवतार भिकाऱ्याला तोडीस तोड झाला आहे. करुणा, दया , तिरस्कार युक्त नाजरांना तोंड देण्याची हिम्मत नसलेला मी मान खाली घालून चालत होतो. 

कॉलनीत निमुळता आणि रुंद असलेला रस्ता नंतर मोठा होत चालला होता. वाहनांची जराशी वरदळ होती . एका  कोपऱ्यात एक घर होतं आणि त्याच्या मध्येच एक किराणा दूकान . माझी पाऊल  नकळत त्या दूकाना कडे गेली . तिथं  एक सुंदर मुलगी बसली होती मला पाहताच ती चटकन उठली आणि 

" पिताजी पिताजी कोई भिखारी आया है" असं म्हणत आत गेली.   कुण्या सामान्य प्रतिष्ठित घरच्या मुलाला हे शब्द तीव्र बाणा सारखे लागायला हवेत परंतु मला किंबहुना माझ्या मनाला याचा काडीमात्र फरक पडला नाही.कदाचित हे भिकारी पण माझ्या मनाने दागिना म्हणून आत्मसात केलं असल पाहिजे. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक वयस्कर पिवळ धोतर आणि उघड्या अंगावर जानवं घातलेला माणूस बाहेर आला. 

"क्या चाहिए?" अगदी तिरस्काराच्या आविर्भावात त्याने विचारलं .

"एक दूध पाकिट , एक काडेपिटी और दो सिगारेट " मी म्हटल .

सिगारेट च नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात गेलला तो दुकानदार मोठ्याने किंचाळला " सिगारेट विगारेट कुछ नही मिलती इधर .

मी उद्गारलो " दूध पाकिट और काडेपीटी " 

"काडेपिटी? "  तो .

"माचिस.... माचिस" मी .

पुन्हा एकदा त्याने तिरस्काराने पाहिलं आणि काडेपीटी आणि  दूध पिशवी आनली माझ्या हातात न ठेवता काऊंटर वर ठेवली. मला काय समजायचं होत ते मी समजावून घेतल. पैसे काऊंटर वर ठेवले समान घेतल आणि माघारी निघालो. 

खाली मान घालून चालताना अजून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे माझ्या पायांची नखे अक्राविक्राळ वाढली होती. ही वाढलेलं नखं , अनियंत्रित वाढलेले केस आणि दाढी...जणू हेच घटक मला सजीव असल्याची जाणीव करून देत होते. मोठा असलेला रस्ता निमुळता होत गेला आणि अखेर गेट जवळ येऊन थांबला. तर ती मांजर तिथेच होती  पण तिचा चेहरा खुलला होता . किंबहुना तिने माझ्या हातातील दुधाची पिशवी पहिली असावी. प्रेमाने तिला गोंजरल ती सुद्धा मला अलगद बिलगली आणि खाली उतरली. मी जसा दरवाजा उघडला तसा ती आत पळाली .मी आत पाऊल ठेवताच एक उग्र असा वास डोक्या ला मुंग्या देऊन गेला रुम मध्ये नजर फिरवली तर ४ दिवसां पासून ची भाजी तशीच टेबल वर पडली होती . सगळी रूम अस्ता व्यस्त होती . रूमच्या एका कोपऱ्यात दवाज्याच्या मागच्या बाजूला कचरा साठला  होता . रूमच्या बरोबर मधून मुग्यांची रांग शिस्तबद्ध पद्धतीने  कचऱ्याच्या ढिगाऱ्या कडे चालली होती. माझ लक्ष माझ्या आवडत्या कोपऱ्याकडे गेलं खिडकी ला चिटकून असलेला माझा टेबल त्या समोर खर्ची आणि खिडकीच्या शेजारी असलेलं रॅक जे पुस्तकांनी भरल होतं. माझ्या या आवडत्या कोपऱ्याला घुळी चं आवरण चढल होतं तर खुर्ची आणि रॅक वर कोळी किडयांनी संसार मांडला होता. माझ्या सोबत गप्पा मारणारी पुस्तक आता निर्जीव होऊन पडली होती. तेवढ्यात मोबाईल वाजला मातोश्री अस नाव झळकत होत. फोन उचलला तर संतापलेली आई ओरडू लागली.

" अरे अक्कल आहे का तूलाss कीती फोन करायचे आम्ही . तू स्वतः हून तर कधी फोन करीत नाहीस निदान आम्ही केलेला फोन उचलून जिवंत असल्याची साक्ष दयावी कमीत कमी . " आईच्या संताप युक्त बोलण्याने आता व्याकूळता आणि करुणेची कास धरली होती .

" अगं आई झोपलो होतो मी त्यामुळे मला रिंग ऐकु आली नसावी कदाचित " असं मी म्हटल .

पुन्हा आई काळजी च्या स्वरात दबक्या आवाजात बोलू लागली

"बाळा तीन दिवसां पासून फोन लावतोय तूला आम्ही . तूला माहिती आहे ना तूझ्या बापाच कसं आहे . ते बाहेर गेलेत  तेवड्यात . तूला फोन केलाय मी" .

तिच्या प्रश्नांना कशीबशी उत्तरे दिली आणि फोन ठेवला .

फोन बघितला तर आज १ तारीख होती  १ जानेवारी ...

काळजात धस्स झालं . मला जेवढ आठवतयं त्यात मी २९ तारखेला खूप उशीरा झोपलो होतो . मी तब्बल ३ दिवस झोपलो होतो. 

मांजर पायाशी खेळू लागली तसा तिला भांड्या मध्ये दूध दिलं...बेड वर जरा इकडे तिकडे पाहिलं...उशी जवळ सिगारेट च पाकीट होत...पटकन एक सिगारेट काढली आणि ओढत आरश्या समोर गेलो....

मनात विचार येऊ लागले.स्वतःची लाज वाटावी असा अवतार झाला होता माझा. गुदगुल्या करणारे केस कानात टोचू लागले होते. दाढी गळ्या भोवती फास आवळत होती. अलगद डोळ्यात अश्रू तरळले मन फक्त एवढच सांगत होते की तू असा  नव्हतास . मी माझ्या परिस्थितीची कारण भूत काळात हूडक होतो....भूत काळाच्या दलदलीने माझ्या वर्तमानाला घट्ट पडून ठेवलं होत. भूतकाळातील आठवणींची गोचिडे  माझ्या वर्तमान आणि भविष्याच शोषण करत होती .   विचार करीत हातातील संपलेली सिगारेट खाली टाकली पायाने विजवली. दरवाज्यात येऊन उभा राहिलोच होतो की तोपर्यंत मला ती दिसली तिच्या सोबत कोणी तरी मुलगा होता. अगदी लाडात येऊन त्याचा हात तिने पकडला होता. मी क्षणार्धात आत आलो आणि दरवाजा बंद केला.

बेड वर पडलो... माझं मन विचार करत होत फक्त तिचा तिच्या त्याचा....

( क्रमशः) 

( भाग २ लवकरच प्रदर्शित केला जाईल)