दिल दोस्ती नटसम्राट भाग २ | Dil dosti natsamrat : part-2

दिल दोस्ती नटसम्राट  भाग २



दुरून कुठून तरी कोणाच्या तरी लग्नाचा बॅंड बाजा चा आवाज कानावर पडतोय , त्या आवाजाने जाम डोक दुखायला लागलय आणि घरी पाहुणे सुद्धा आलेत , एक महत्वाच सांगायच राहूनच गेल उद्या माझा इम्पॉर्टंट पेपर आहे , आणि मी मन लावून स्टोरी लिहायचा अभ्यास करतोय , मागच्या वेळेस मी सांगितलं की चित्तप्रसाद , बबन , आणि माझी मैत्री कशी झाली ते .

आज सांगतो की आम्ही तिघ आमच्या आयुष्याच्या प्रवासात सोबत कशे आलो , दुसर्‍या दिवशी सकाळी चित्तप्रसाद जेव्हा झोपेतून जागा झाला तेव्हा मी त्याच्याकडे टक लाऊन बघत बसलो होतो , त्याने माझ्याकडे पाहून एक मोठी स्माइल दिली , मी त्याच्याकडे आणखी रागानेच पाहत होतो आणि माझ्या कानावर आणखी सुधा बबन च्या उलट्या करण्याचा आवाज येत होता , बिचारा उलट्या करून हैराण झाला होता . स्माइल देत डोळे चोळत चोळत चित्तप्रसाद म्हणाला गुड मॉर्निंग. त्या मॉर्निंग मध्ये गुड काय आहे हे फक्त चित्तप्रसादलाच माहीत होत. त्याला बघून मीही त्याला बाय म्हणालो आणि थेट माझ्या रूम मध्ये गेलो बेड वर पालथा पडलो.

आणि इथून भेटला मला माझ्या लाइफ चा टर्निंग पॉइंट , मी आणि बबन रेंट्स च्या रूम मध्ये राहायचो आणि चित्त्प्रसाद चा त्या सोसायटी मध्ये स्वतहाचा फ्लॅट होता.

दुपारचे तीन वाजले असतील माझ्या रूम ची डोर बेल वाजली इच्छा नसताना देखील मी उठलो आणि दरवाजा उघडला , दरवाज्याच्या बाहेर बबन आणि आमचा घर मालक उभा होता , बबन च्या चेहर्‍यावरचा रंग उडालेला पाहून मी त्याला डोळ्याने खुनवल काय झाल ,तेवढ्यात आमचा घर मालक चेहर्‍यावर एक स्माइल दाखवत म्हणाला बाळ रोहित अरे मी हे फ्लॅट्स विकलेले आहेत तेव्हा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहायची सोय करा . मी फुल टेंशन मध्ये येऊन त्यांना म्हणालो आता दुसरीकडे अचानक कुठेतरी घर, आणि येवढ्या लवकर काका प्लीज काहीतरी अॅडजस्टमेंट करा ना , भरपूर वेळ request केल्यानंतर त्यांनी बबन ला आणि मला एक आयडिया दिली ती आयडिया अशी होती की मी , बबन चित्तप्रसाद च्या घरी राहायला जा वाटल्यास मी चित्तप्रसाद ला सांगतो , मला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण त्या घर मालकाच्या मुलीवर माझ प्रेम होत , म्हणून मी न विचार करतो हो म्हणून टाकल पण बबन लगेच  गोष्टीसाठी तयार नाही झाला , मग मी त्याला खूप समजवला पण बबन मला एकाच गोष्टीची आठवण करून द्यायचा ती म्हणजे कालची रात्र , भरपूर प्रयत्नांनंतर  मी त्याला समजवल . त्यानंतर मी घर मालकाला विचारलं की चित्तप्रसाद ह्या गोष्टी साठी तयार होईल का ? त्यावर ते हसत हसत म्हणाले की अरे तो माझा पाहुणा आहे आणि माझ सगळ ऐकतो , ह्या सगळ्या गोष्टींनंतर मला एक गोष्ट समजली की चित्त्प्रसाद समोर आता मालकाच्या पोरीबद्दल काहीही नाही बोलायच , त्याच रात्री मी आणि बबन चित्तप्रसाद च्या रूम मध्ये शिफ्ट झालो . चित्तप्रसाद आता मला थोडा वेगळा वाटायला लागला. त्या रात्री चित्तप्रसाद ने बबन ला आणि मला बोलावलं आणि बबन आल्या आल्या म्हणाला की भाऊ मला माफ कर पण आज मी सोडया मध्ये बिस्किट बुडवून खाणार नाही , चित्तप्रसाद त्याला हसत हसत म्हणाला की नाही आज तुम्हाला मी काही तरी सांगणार आहे , चित्तप्रसाद ने काही जरि सांगितलं तरी मला त्याच्या सोबतच राहायच होत , पण बबन डरपोक होता मला त्याचा देखील इलाज शोधायचा होता , सो चित्तप्रसाद च्या प्रत्तेक गोष्टीसाठी मी तयार बसलो होतो