दिल दोस्ती नटसम्राट १ | मराठी विनोदी कथा
रात्र विचित्र की विचित्र रात्र
शब्द जरि यमक वाटत असले तरी आठवणी मध्ये राहणारी गोष्ट आहे
रात्र विचित्र म्हणावं की विचित्र रात्र , हा पण प्रश्न आणखी नाही सुटला चित्तप्रसाद च्या
रूम वर रात्रीच काहीतरी झणझणीत करून खायचा माझा प्लॅन लवकरच आम्ही आमलात
आणणार होतो ,पण शेजारच्या रूम मध्ये राहणार्या एका मुलाने
नेहेमीप्रमाणे आमच्या प्लॅन मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली व्हॉट अॅन एंट्री इट वॉज ( एकदम फालतू ) .
चित्तप्रसाद आणि मी तरी कुठे
शांत बसणारे होतो सर्वात पहिलं तर रात्री साडे दहा वाजता झणझणीत मिसळ बनवली , मिसळ खाऊन आम्ही
दोघ एकदम जास्त तृप्त झालो होतो कारण मिसळ चा सगळा खर्च आम्ही त्या मुलाकडून करवून
घेतला होता , तेव्हा पासून तो आमचा खास मित्र झाला . त्याच नाव बबन होत, कदाचित ती रात्र
आम्हा तिघांना चांगले मित्र बनवण्यासाठीच असावी पण आम्ही तर त्या रात्री बबन ल
त्रास द्यायचं ठरवलं होत जेवणं झाल्यावर बबन म्हणाला मी जातो माझ्या रूम मधेच
झोपतो जाऊन तुम्ही बघत बसा मूवीज ,
एखाद्याचे पैसे घेतल्यावर
त्याच्या चेहर्याचे काय भाव दिसणार ही काही सांगायची गोष्ट नाही , चित्तप्रसाद ने
त्याला बळबळ बसवलं आणि तिकडून एक सोड्याची बाटली आणली आणि एक बिस्किट च पॅकेट ही , मला वाटल
चित्तप्रसाद ला बबन ची दया आली असावी मी ही चित्तप्रसाद कुतुहलाने पाहत
माझ्या मनात एक फ्लॅट बूक केला आणि त्या फ्लॅट ची चावी चित्तप्रसाद ल देणार
इतक्याच चित्तप्रसाद ने ते बिस्किट पॅकेट बबन ल सोड्यात बुडवून खायला लावल. मला हसायलाही
येत होत आणि बबन ची दया पण येत होती . खरच बबन च चेहरा पाहण्यासारखा झाला होता , नको नको म्हणता बबन
वर हा प्रयोग करण्यात आला एका क्षणासाठी वाटल की बबन आमच्यावर पोलिस केस टाकेल पण
तास काही नाही झालं ,
जरा करामतीच आहे चित्तप्रसाद
असा विचार मनात आला तेवढ्यात बबन म्हणाला मी जातो माझ्या रूम मध्ये तुम्ही एंजॉय
करा मला कसतरी होतय हे कानावर पडताच चित्त्प्रसाद ने त्याला जबरदस्तीने बेड वर
ढकलल , बबन ओरडला भाऊ मला सोडा मला दोन मिनिटांसाठी समजलच नाही हा
काय करतोय , चित्तप्रसाद ने एक हॉरर मूवी लावली बबन तसले पिक्चर बघायला
घाबरायचा हॉरर सीन आले की बबन डोळे बंद करायचा आणि चित्तप्रसाद जबरदस्तीने त्याचे
डोळे उघडायला मजबूर करायचा रात्री तीन वाजता तो चित्रपठ पाहून झाल्यानंतर
चित्त्प्रसाद ला काय हुक्की आली कुणास ठाऊक तो बबन ला म्हणाला तुला जर रूम मध्ये
जायाच असेल तर जा आता मी विचारात पडलो की याच्या डोक्यात काय चालुये.
तेवढ्यात बबन तिथून मधून निघून
गेला. मी चित्तप्रसाद ल म्हणालो की कुणाला टोर्चर करायला तुझ्याकडून शिकाव , हे काहीच नाही हा
फक्त टाइमपास होता आता बघ बबन परत दोन मिनिटात परत येईल , मी म्हणालो आता
कशाला येईल तो परत, तेवढ्यात समोरून बबन आला आणि मला म्हणाला मला एकट्याला भीती
वाटतिये मी इथेच झोपतो , तिकडून चित्तप्रसाद ओरडला ठिके मी झोपतो आता गुड नाइट आणि
रोहित बेस्ट ऑफ लक मी परत त्याला काही विचाराच्या आत तो झोपला सुद्धा होता आणि मी
विचार करत बेड वर पडलो होतो.
मी बबन ला विचारलं
हा अस का बोलला असावा बबन मला म्हणाला येवढा वेळ मला एकट्याला टोर्चर केल आता
तुझी बारी , बबन परत म्हणाला मला कस तरी होतय, त्या रात्री बबन
रात्र भर उलट्या करत होता आणि मी रात्रभर त्याच्यामुळे जागा होतो.आणि रात्र भर विचार
करत बसलो की हि रात्र किती विचित्र आहे.
वाह रे
चित्तप्रसाद

