#भावनांची घुसमट
मनुस्मृति
आम्ही मैत्रिणी काही दिवसांपूर्वी एकत्र फोन वर गप्पा ठोकत होतो..सुरुवातीला एकमेकांची काढणं,, उडवणं चालू होत..मग कोणाचं काय चालू कधी भेटतोय वगैरे गप्पा झाल्या..आणि हळू हळू चाललेली उडवा उडवी शांत झाली..एक मैत्रीण म्हणाली अग मला काही सांगायचंय मला ना असं आतल्या आत दबल्यासारखं होतंय..म्हणजे कोणीतरी मला अस अंधाऱ्या खोलीत बांधून ठेवावं असं वाटतंय ग..अस घुसमटल्यासारखं होतंय.. आम्ही सगळ्या शांत .. ती बोलत होती.. अगं याला माझ्यासाठी वेळच नसतो असं वाटत मला..म्हणजे हा नाहीच आहे माझ्यासाठी .. दिवसभर काम आणि फ्री झाला की त्याला त्याच काही करायचं असत.. मला असं वाटत सकाळी उठणं जेवण करण काम करणं हे सोडून आमच्यामध्ये असं काही राहीलच नाहीये.. तो त्याच्या कामात एकदम पटाईत आहे.. पण मग माझं काय चालू असत मला काय हवंय याच त्याला काहीच पडलेलं नसत.. त्याला माझं काही सांगायला गेले की तो मला तू खूपच इमोशनल आहेस असं बोलतो आणि गप्प करतो ..मला पुढे इच्छा च राहत नाही त्याला काही सांगायची ..
तिच्या आवाजात तिला होणार त्रास जाणवत होता.. बोलता बोलता मॅडम एकदम रडायला लागल्या.. मला ना सगळं सोडून पळून जावस वाटत..काम करायचं काही नाही ग..माझा नवरा आहे माझी मुलं आहेत पण मग आमचं काय..माझ्या भावनांचं काय .. नात्यात भावनीक गरज पण पूर्ण व्हायला हवी न ..
आणि मग सगळ्या जणी तिला आपापल्या मार्गाने शांत करत होत्या ..
आज काल हे खरच फार कानावर येत... की आमच्यामध्ये आता तितकं sharing होत नाही..आम्ही आता तितकं एकमेकांशी बोलत नाही .. मला असं वाटत इथूनच सुरुवात होते एकमेकांपासून दूर जायला..लग्न काय फक्त शारिरीक गरजा भागवण्यासाठी थोडीच न करतो आपण.. का असं होत की याच व्यक्तीशी आपण लग्नापूर्वी किंवा लग्न झाल्यावर भरपूर एन्जॉय करतो.. अगदी हाच माझं विश्व असं होत किंवा हीच माझी सगळी काही असं होत आपल्याला आणि नंतर नको नको होत ... कारण एकच तितकं बोलणं तितकं शेअर करणं न राहणं ..
आपल्या पार्टनर ला सांगा की मला तुझी भावनीक गरज जास्त आहे... शारीरिक गरजा त्या क्षणांसाठी असतात .. पण भावनिक गरज नेहमीच असते.. आपल्या आत काय चालूं आहे ..किंवा त्याच्या ही मनात काय चालूं आहे हे आपल्याला माहित असावं..याच अर्थ असा नक्कीच नाही की आपण हात धूऊन मागे लागावं की सांग मला काय झालं काय झालं..ते आतून आलं पाहिजे न.. तुम्हाला वाटतंय न बोलावं .. मग खुशाल बोला.. हक्क आहे तुमचा .. लग्न हे शारीरिक भावनिक मानसिक आर्थिक अश्या सगळ्याच गरजा पूर्ण करण्यासाठी आपण करतो..
इतकी वेळ कधीच येऊ देऊ नका की आपल्या भावनांची आत घुसमट होतेय.. का ही लेवल यावी..खूपदा अस होत की आपल्याला असं वाटत मी काही न बोलता याने मला समजून घ्यावं ..पण माझी बाय ते नाही ग शक्य.. न बोलता समोरच्याला कस कळणार आपल्याला काय हवं .. काय नको .. कधी विचार केला आहे का की भांडणात च आवाज मोठे का होतात आणि प्रेमात शांत ..दोन्ही वेळा समोरच्याला आवाज येत च असतो की..फरक इतकाच की भांडणात भावनांचा आक्रोश बाहेर पडतो.. ती वेळ कधीतरी च आली तर ठीक पण सारखी यायची वेळ आणू नका..... मला वाटत म्हणूनच संसाराला गाडीचं स्वरूप देतात.. दोन्ही चाकांची गरज असते न ..एक खराब झालं की होतो तो एक्मसीडेंट ग त्याला पण मेन्टेन करा..मधून ग्रीसिंग करा..
होत काय की आपण समोरच्याला गृहीत धरतो..कुठे जाणार आहे मला सोडून..शेवटी माझ्याकडे च येणार आहे..पण आपल्या अश्या वागण्याने समोरच्याच्या मनाचा ,भावनांचा जो काही चुथडा होतो त्याची भरपाई करण अशक्यच..कारण या सगळ्या मध्ये ती व्यक्ती मनानें आपल्यापासून खूप दूर जाते .. शेवटी जे काही करतोय ते आपल्यांसाठीच न मग आपल्याकडे त्यांच्यासाठीच वेळ नाही तर खरच काय उपयोग याचा ..
आता काही नग असतात की ज्यांना नाही समजत..मग बोलून दाखवा.. खूप मस्त वाटत जेव्हा आपल्या पार्टनर बरोबर आपण मनसोक्त गप्पा मारतो.. आणि हो समोरच्याला सांगून ही जर का कळत नसेल तर मग या सगळ्याला खरच काही अर्थ नाही.. समजून जा की तुम्ही तुम्हाला अजून त्रास करून घेताय..इतके समोरच्याच्या पायात ही पडू नका की स्वतःच्या नजरेत तुम्ही पडाल ..कारण नात्यात गरज ही दोघांना हवी तरच ते नातं ..
काल व पु काळेंची एक सुंदर पोस्ट नजरेत पडली ..
बायको शरीराने दूर गेली तर एक वेळेस तिला परत आणता येत, पण जर का ती च बायको मनाने, विचाराने तुमच्यापासून दूर गेली तर तिला परत आणण अशक्यच .
