साजणी तू माझी
माझ नाव अनिरुद्ध
ही स्टोरी सुरू होते माझ्या सिनिएर कॉलेज च्या पहिल्या दिवसापासून
एखाद्या फॉरमॅट झालेल्या Pen drive सारखी फीलिंग माझ्या मनात येत होती
कारण माझ्या जुन्या कॉलेज मधल कोणीच मला अजून दिसल नव्हत,तसं बरच होत ते की कोणी दिसत नव्हतं .पण आमच नशीब कुठ येवढ चांगलं मी सहजच मागे वळालो
आणि माझ्या मागच्या कॉलेज मधली एक मुलगी माझ्या समोर आली ,तिची आणि माझी काही एवढी खास ओळख नव्हती . अचानक समोर आल्यामुळे माझ्या तोंडून जे काही शब्ध निघाले तेच तिने माझ्या गालावर काढले .ते शब्ध होते “unnecessary data found” वाह काय कॉलेज च्या पहिल्या दिवसाची सुरवात झाली होती माझ्या जीवनात कधीच मी माझ्या कॉलेज च पहिला दिवस विसरणार नाही.
कॉलेज तसं मस्त होत पण सुरवातच तुफानी झाली म्हंटल्यावर जाऊदे
घडलेल्या सर्व प्रकारामुळे थोडा अप्सेट होतो ,हे झाल्यावर वर्ग शोधता शोधता दोन नवीन मित्र झाले . एकाच नाव दिपक आणि दूसरा अजातशास्त्री
त्याच नाव घ्यायला खूप अवघड जायच म्हणून त्याला आम्ही अज्या म्हणायचो
वर्गात जाताच शेवटच्या बेंच कडे धाव घेतली . वर्गात 2-3 मुली गोंधळ घालत होत्या
किलबिल किलबिल खरच खूप डोक पकल होत पण तेवढ्यात त्या घोळक्यात unnecessary data दिसला .तिला पाहून आपोआप माझा हात गालावर गेला
तिने माझ्याकडे पहिले मी खाली आणि एकडे तिकडे पहायला लागलो ती माझ्या दिशेने चालत येत होती , तेवढ्यात माला अज्या म्हणाला की ती मुलगी आपल्याकडे येतीये पण मी त्याला काही कस सांगू शकणार की ती माझ्या कडेच येत होती , ती माझ्या बेंच पाशी आली आणि मला येऊन सॉरी म्हणाली
अज्या आणि दिपक माझ्याकडे विचित्र प्रकारे पहायला लागले मी तिला म्हणालो इट्स ओके दॅट्स माय फॉल्ट actually सॉरी मला म्हणायला पाहिजे होत
आणि ती तिथून निघून गेली .अज्या आणि दिपक मला विचारायला लागले की काय झालं ती का तुला सॉरी म्हंनतिये आपल भांड फुटू नये म्हणून मी पण त्यांना फिल्मी स्टाइल मध्ये उत्तर दिल “अपणा नाम ओऱ रुतबा इतणा हे की सब हमारे सामने झुकते है”
दिपक म्हणाला मग तू का तिला सॉरी म्हणाला मी फिल्मी dialogue मारणार तेवढ्यात समोरून एक लाइट यल्लो कलर चा ड्रेस घातलेली एक मुलगी माझ्या समोरच्या बेंच वर येऊन बसली तिला पाहून माझ्या मेमोरी ही स्पेस आपोआप वाढ्लि
अचानक मला तिला पाहून कविता करू वाटायला लागलं ,मी कवितेचा क माझ्या मनात आणलाच तेवढ्यात क्लास टीचरची वर्गात एंट्री झाली .आणि माझी कविता तयार व्हयायच्या आधीच पोरकी झाली ,
मी दिवसभर त्या मुलीकडे पाहत बसायचो , कॉलेज चे 2-3 दिवस असेच गेले त्या दोन तीन दिवसात unnecessary data म्हणजेच भविषा माझी चांगली मैत्रीण झाली . मी भविषा दिपक आणि अज्या चांगले मित्र बनलो . कदाचित भविषा ला माझ्या मनातल्या त्या मुली बद्दल च्या फीलिंग्स समजायला लागल्या होत्या. आणि तिणी मला डायरेक्ट विचारलं की तुला ती आवडते का?
मग मी लाजत लाजत तिच्या पासून लपवण्याचा प्रयत्न केला ,पण लपऊ शकलो नाही
मला भुरळ घालणार्या मुलीच नाव होत सार्थकी
बट कहाणी मे अभि ट्विस्ट आणा बाकी था
सार्थकी नाव जरी घेतलं तरी माझ्या अंगावर काटा याचा
मी स्वतः कन्फ्युज होतो की माझ्यासोबत आस का होतय
भाविषा सोबत मी काही जास्त फ्रीली बोलू शकत नसायचो शेवटी तीही एक मुलगी मग मी माझी फीलिंग अज्या आणि दिपक सोबत शेअर केली ,मग काय माझ्या प्रिय मित्रांनी मला तिची पूर्ण हिस्टरी सांगितली जस की तिच्या शाळेपासून ते तिच्या गावापर्यंत..म्हणजे ते काही त्यांनी तिला काही डायरेक्ट विचारलं नव्हतं त्यांनी सुद्धा हे काम भाविषा ला करायला सांगितलं आणि भाविषाला माझ्या फीलिंग्स बद्दल समजलं
या नंतर ती माझ्याकडे आली आणि मला तिच्या नावाने चिडवायला लागली मग काय ओन्ली blush-blush , मला पण भाविषाला चिडवायच होत त्यासाठी मी माझ्या जुन्या कॉलेज मधल्या मित्राला फोन लावला आणि भाविषा च्या बॉयफ्रेंड च शोधायला लावला त्यांनी मला लगेच त्याच नाव सांगितलं आणि तो सुद्धा माझा मित्रच निघाला मग काय भाविषा सहजच माझ्याकडे पाहून हसली आणि मला सार्थकी म्हणून आवाज दिला मग मी पण तिच्याकडे पाहून लाजलो आणि म्हणालो बोल न पप्या , हा तोच जो भाविषाचा बॉयफ्रेंड होता , माझा हा रीप्लाय पाहून ती एकदम शॉक झाली होती ,मग जेव्हा जेव्हा ती मला सार्थकी नावाने आवाज द्यायची त्यानंतर मी तिला पप्या म्हणायचो,आणि इथून सुरू झाली खरी सुरवात माझ्या लव स्टोरी ला .
एकदिवस मी आणि अज्या कॉलेज च्या गार्डन मध्ये भाविषा आणि दिपक यांची वाट पाहत बसलो होतो , आणि तेवढ्यात सार्थकी तिथून जाताना दिसली ,मी विचारांमध्ये हरवलो की एखद्या मूवी मधल्या सीन सारखं व्हावं आणि मी तिच्या नजरेत याव
तेवढ्यात एका मुलाने तिला आढवल आणि प्रपोज केल तिने त्याच्या जोरात कानाखाली टाकली आणि डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफिस मध्ये गेली .
या गोष्टी नंतर तर माझ्या कॉन्फिडंस मध्ये खूप मोठा बदल झाला तिच्याकडे पाहणे सोडून दिल कारण मी कुठल्या फिल्म मधला हीरो नव्हतो आणि माझ्या मित्रांना सांगितलं की हा विषय आता इथच थांबवायचा मग त्यांनी सुद्धा मला जास्त फोर्स नाही केल
2 महिन्यांनातर
मला अस वाटायला लागलं की आता माझी लव स्टोरी संपली कारण त्या 2 महिन्या मध्ये तिने 3 प्रोपोसल नाकारले होते मला अस वाटायला लागलं की आपला तर काही चान्स नाहीये .माझ कुठल्या गोष्टींमधे लक्ष लागत नसायच माझ्या मनातली ही गोष्ट भाविषा ला चांगलीच समजली होती ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की सार्थकी सुद्धा कदाचित लाइक करते,अनिरुद्ध आय थिंक तू सार्थकी ला प्रपोज करायला पाहिजे कारण मी तुझ्या डोळ्यात तिझ्यासाठी खूप प्रेम पाहिलय
भाविषा च्या ह्या हेवि डायलौग नंतर माझ्या हृदयात परत प्रेमाच गुलाब फुलायला सुरवात झाली .पण मी तिला मोठेपणा दाखवत म्हणालो अस काहीही नाही . मग भाविषा म्हणाली की ठिके आता तुला मी प्रपोज मारायलाच लावणारच ,मला पण तेच पाहिजे होत . आणि त्या दिवसापासून ती सार्थकी सोबत जास्त राहायला लागली.काही दिवसांमध्ये कॉलेज मध्ये प्रोजेक्ट कॉम्पटिशन होती , त्या प्रोजेक्ट साठी मी,दिपक आणि अज्या पार्टनर होतो .आणि तिकडे भाविषा आणि सार्थकी. कॉलेज मध्ये पहिल्या 3 मध्ये येणार्या प्रोजेक्ट नेक्स्ट लेवल साठी क्वालिफाय होणार होते . मला तर फुल गरेण्टी होती की माझा प्रोजेक्ट क्वालिफाय होणारच ,प्रोजेक्ट च्या निमित्ताने भाविषा मुळे मला सार्थकी ला बोलायला भेटायचं .आणि आमच्या कॉलेज मधून माझा आणि भाविषा चा प्रोजेक्ट क्वालिफाय झाला मी खुश होतो .नेक्स्ट राऊंड साठी आमचा प्रोजेक्ट दुसर्या कॉलेज मध्ये प्रेझेंट करायचा होता , आणि माझ्या लव स्टोरी चा टर्निंग पॉइंट भाविषा ने तयार केला , प्रोजेक्ट च्या वेळेस भाविषा सार्थकी ला जाऊन सांगितलं की नेक्स्ट राऊंड साठी तुझ प्रोजेक्ट पार्टनर मला नाही होता येणार माझ्या जागी अनिरुद्ध तुझ्या सोबत काम करेल तिलाही या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नसावा . आणि आम्ही प्रोजेक्ट च्या निमित्ताने फर्स्ट टाइम एक पूर्ण दिवस सोबत घालवला, खूप मस्त होता तो दिवस .
आय थिंक ती माझ्या प्रेमाला मैत्री समजत होती आणि मी तिच्या मैत्रीला प्रेम . का खरच हे प्रेम होत मला तेव्हा ते नाही समजल 3-4 दिवस आम्ही खूप एकमेकांसोबत वेळ घालवला आणि आमच्या मध्ये खूप चांगली मैत्री तरि झालीच होती.
मग माझ्या प्रोजेक्ट चा दिवस जवळ आला आणि मी आणि माझी पूर्ण गॅंग घेऊन त्या दुसर्या कॉलेज मध्ये पोहोचलो.मी त्या दिवशी ठाम ठरवलं होत की आज सार्थकी ला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन झाल्यावर प्रपोज कारायचं,पण अश्या वेळेस काहीच सुचत नाही न आम्ही प्रोजेक्ट प्रेझेंटेशन दिल आणि तिथ सुद्धा अज्या आणि दिपक चा प्रोजेक्ट पहिला आला आणि मी आणि सार्थकी पाचवे , आम्ही सगळे खुश होतो ,मी सार्थकी ला प्रपोज करणार आहे मी कोणालाच नव्हत सांगितलं ,बाहेर आल्यावर मी ही गोष्ट अज्या आणि दिपक ला सांगितली , ते तर खूप खुश झाले
TO BE CONTINUE………
जर तुम्हाला तुमच्या मराठी कथा , कविता ,वीडियोस आणि तुम्ही तयार केलेले विनोद आणखी काही साहित्य ब्लॉग वर पोस्ट करण्यासाठी मेल करू शकता.
