शेतकरी आणि विहीर
तेव्हा त्याने त्याच्या शेजार्याकडून विहीर विकत घेतली. शेजारी मात्र धूर्त होता. दुसर्या दिवशी शेतकरी त्याच्या विहिरीवरुन पाणी काढायला येत असताना शेजारयाने त्याला पाणी घेण्यास नकार दिला.
जेव्हा शेतकर्याने असे विचारले तेव्हा त्या शेजारयाने उत्तर दिले, “मी तुम्हांला विहीर विकली आहे , पाणी नाही” आणि निघून गेले. वैतागून तो शेतकरी सम्राटाकडे न्याय मागण्यासाठी गेला. त्याने जे घडले ते सांगितले.
सम्राटाने आपल्या नऊ रत्नान्पैकी एक, दरबारी असलेल्या बीरबलला बोलावले. बीरबलने शेजारयाला प्रश्न विचारला, “तुम्ही शेतकर्याला विहिरीतून पाणी का घेऊ देत नाही? तुम्ही शेतकर्याला विहीर विकली का? ”
शेजारयाने उत्तर दिले, “बीरबल, मी शेतातली विहीर विकली पण त्यातील पाणी नाही. विहिरीतून पाणी घेण्याचा त्याला अधिकार नाही. ” बीरबल म्हणाले, “पाहा, तुम्ही विहीर विकल्यामुळे तुमच्याकडे शेतकर्याच्या विहिरीमध्ये पाणी ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही. एकतर तुम्ही शेतकर्याला भाडे द्या किंवा ताबडतोब पानी काढून घ्या. ” आपली योजना अयशस्वी झाल्याचे समजल्यावर शेजा्याने माफी मागितली आणि घरी गेले.
बोध
फसवणूक केल्याने आपल्याला काहीही मिळणार नाही. जर आपण फसवणूक केली तर आपल्याला त्याचे फळ भोगावे लागते.
