डिटेक्टिव बंड्या
पुण्याच्या एस बी रोड परिसरात सकाळपासुनच पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजत होता , पोलिसांच्या गाडीच्या सायरन च्या आवाजात आता एम्बुलेंस नि सुद्धा भर घातली . एका बंगल्याच्या बाहेर गर्दी जमलेली होती , काही हवालदार तिथल्या जमा लोकांना काहीतरी विचारपूस करत होते , तेवढ्यात तिथे आणखी एक पोलिसाची जीप आली आणि त्या मधून टी शर्ट आणि जीन्स घातलेला एकदम स्टाइलिश रुबाबदार तरुण खाली उतरला त्याच्याकडे पाहून कोणीही सांगू शकलं असत की तो एक इंस्पेक्टर आहे.
त्याला पाहताच एक हवालदार त्याच्या कड़े धावत गेला आणि समोर असलेल्या घराकडे बोट दाखवत म्हणाला साहेब ह्या दिशेला इकड या , इंस्पेक्टर च नाव महेश जाधव. नाव फिल्मी जरी असल तरी इंस्पेक्टर जाधव रियल लाइफ च्या हीरो पेक्षा कमी नव्हता
तेवढ्यात त्या इंस्पेक्टर ने हवालदाराला विचारल शिंदे काही पुरावे सापडले का ? शिंदे इंस्पेक्टर ला म्हणाला साहेब मी माझ्या उभ्या आयुष्यात असला मर्डर पाहिला नाही.
तेवढ्यात तो इंस्पेक्टर म्हणाला का काय झालय ? बोलता बोलता ते खून झालेल्या रूम मध्ये आले आणि झालेला खून पाहून इंस्पेक्टर अचंबित झाला , समोर पडलेल्या मृतदेहाचे दोन्ही पाय बांधलेले होते , दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडलेले होते आणि त्यांच्या मध्ये एक लोखंडी सळई घुसवलेली होती ,आणि मृतदेहाचे दोन्ही कान कापलेले होते , मृतदेह साधारणता २५ वर्षाच्या मुलाचा होता .इंस्पेक्टर ची नज़र पूर्ण रूम मध्ये फिरत काहीतरी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत होती , इकडे तिकडे पाहता पाहता बारीक़ आवाजात इंस्पेक्टर ने शिंदे हवालदाराला विचारल बॉडी बद्दल काही समजल का ?
शिंदे म्हणाला हां साहेब या मुलाच नाव अंशुमन कोरडे आहे , एस.एस.ओ.टी कॉलेज मध्ये शिकतय
शेजारी पाजारी म्हणत होते पोरगा खुप शांत आहे म्हणून , कधी कोणाला जास्त बोलत पण नव्हता फॅमिली नगर ला असती . त्याच्या एका मित्राचा नंबर भेटला मला त्याला बोलावलय मी , बाकि काही ख़ास समजल नाही साहेब. हां आणखी एक त्याचा लैपटॉप एक सापडला आहे पण त्याला पासवर्ड आहे
तेवढ्यात इंस्पेक्टर ला कॉल आला त्याने रूम मध्ये बघता बघता फ़ोन कानाला लावला आणि म्हणाला बोल निधी , हवालदार शिंदे लक्ष देऊन इंस्पेक्टर च बोलन ऐकत होता तेवढ्यात इंस्पेक्टर आश्चर्यचकित होऊंन ओरडला,
काय ? कुठे ? ओके मी पोहोचतो लगेच .
असे म्हणून त्याने फ़ोन कट केला आणि शिंदे ला म्हणाला शिंदे छोट्यात छोटी गोष्ट शोधून काढ़ा आणि मला एका तासात या व्यतिरिक्त लीड्स द्या , अस बोलूंन तो थेट त्याच्या पोलिस जीप मधून निघून गेला
तेवढ्यात शिंदे हवालदार आणखी एका हवालदाराला म्हणाला लवकर काहीतरी शोधा , जाधव सर एका तासात परत येणारेत आणि बारीक़ आवाजात पुटपुटत म्हणाला एक सुट्टी नाही ४ महीने झाल , कधी देतेत काय माहित , आणि शिंदे परत तिथल्या लोकांना विचारपूस करू लागला .
इकडे इंस्पेक्टर जाधव नविन जागेवर पोहोचला तिकडे सुद्धा गर्दी जमलेली होती , तिथे सुद्धा हवालदार लोकांना विचारपूस करत होते. तिथल्या एका हवालदाराणे इंस्पेक्टर जाधव ला सलाम केला. इंस्पेक्टर जाधव ची नजर कोणाला तरी शोधत होती आणि त्याची नजर एका जागेवर थांबली , तो इंस्पेक्टर निधी पाटिल कड़े पाहत होता , तो तिच्या जवळ गेला आणि विचारल बॉडी कुठय , इंस्पेक्टर निधी पाटिल घराकडे बोट दाखवत म्हणाली आतमध्ये आहे , तो त्या घरामध्ये शिरला समोरची बॉडी पाहून त्याला थोड्या वेळापूर्वी पाहिलेली बॉडी आठवली , या बॉडीचे सुद्धा हात जोडलेले होते त्यात लोखंडी सळई होती आणि कान कापलेले होते.
या आगोदरच्या आणि या मृतदेहा मध्ये खुप साम्य इंस्पेक्टर जाधव ला दिसल , थोड्या विचारत तो बाहेर पडला आणि इंस्पेक्टर निधि ला म्हणाला एस.बी.रोड चा मर्डर सुद्धा हुबेहूब असाच झाला आहे म्हणजे खुनी एकच आहे . ह्या मूला बद्दल काही माहिती भेटली का ? इंस्पेक्टर महेश म्हणाला .
तेवढ्यात इंस्पेक्टर निधि म्हणाली याच नाव अजय राठोड आहे, वय २४-२५ असाव साधारणता , शेजारी सांगत होते हां खुप हुशार आणि शांत मुलगा होता , कधी कोनामध्ये जास्त मिसळत नव्हता त्याचा रूम मेट रात्रि दुसरया मित्राकडे गेला होता तेव्हाच अस झालय .
महेश तुला का्य वाटतय या मागे कोणी सीरियल किलर तर नसेल ना ? इंस्पेक्टर निधि म्हणाली
तिच्या प्रश्नाचे उत्तर देत महेश म्हणाला अस असेल तर आपली नौकरी धोक्यात आहे मैडम चला कामाला लागा . इंस्पेक्टर महेश जाधव आणि इंस्पेक्टर निधि पुन्हा पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात लागले. तेवढ्यात त्या मुलाचा रूममेट तिथे पोहोचला, झालेला सर्व प्रकार पाहून तो खुप घाबरला होता आणि ते त्याच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होत.
दोन दिवस उलटले , आणखी खुनाबद्दल थोड़ी देखिल माहिती समजली नाहीं आणि तेवढ्यात २ दिवसानंतर आणखी एक मर्डर झाला , मर्डर बाकीच्या दोन्ही मर्डर सारखाच होता , इंस्पेक्टर महेश आणि निधि यांना काहीच पुरावे सापडत नव्हते . कमिश्नर साहेबानी दोघांना काहीहीकरुण लवकरात लवकर ही केस सोल्व करण्याचे आदेश दिले. खून खुप भयानक पद्धति ने झाले होते आणि खास गोष्ट म्हणजे एकही पुरावा सापडत नव्हता.
निधि आणि महेश केस बद्दल बोलत होते.
आपली बदली तर फिक्स झालीच बघ आता , इंस्पेक्टर निधि म्हणाली .
तिला उत्तर देत महेश म्हणाला या तिघांमध्ये काहीच कॉमन गोष्टी नाहीत. तिघांच कॉलेज वेगळ आहे मित्रांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तिघांचे कान कापले आहेत एकसारखेच तेवढच.
तेवढ्यात शिंदे हवालदार तिथ आला आणि म्हणाला, साहेब माझ्याकडे एक आईडिया आहे आपण डिटेक्टिव बंड्या कड़े जायच का ? इंस्पेक्टर निधि च्या चेहर्यावर गालातल्या गालात हसू फूटल आणि ती खुश होऊंण म्हणाली अरे हा हे आपल्याला पहिल का नाही सुचल.
पण इंस्पेक्टर महेश जाधव च्या चेहर्यावर एकही भाव दिसत नव्हता आणि निधि च्या मागे तो म्हणाला पण बंड्या ची टीम माझी मदत कधीच करणार नाहि . निधि म्हणाली, का ? ते नक्की मदत करतील , त्यांच्या इंटरेस्ट ची गोष्ट ते कधीच सोडत नाहीत , फ़क्त या वेळेस त्यांनी कुठलीही अट घालू नये म्हणजे झाल. तेवढ्यात इंस्पेक्टर जाधव ला एक कॉल येतो , आणि इंस्पेक्टर जेव्हा कॉल उचलतो
साहेब काही मदत पाहिजे असल तर सांगा नाहीतर या वाड्यावर थोड्या वेळात , आणि फ़ोन कट होतो
इंस्पेक्टर महेश जाधव च तोंड बघून शिंदे त्याला विचारतो काय झाल साहेब ,
आपल्याला बंड्या च निमंत्रण आलय चला
डिटेक्टिव बंड्या एक २४ वर्षाचा मुलगा ज्याने २ वर्षापूर्वी एक मोठी केस सोडवायला त्याच्या मित्रांनसोबत इंस्पेक्टर महेश जाधव ला मदत केलि होती. म्हणजे त्याच नाव काही बंड्या नव्हत पण इंस्पेक्टर महेश त्याला मस्करी मस्करी मध्ये बंड्या म्हणत असत. त्याच्या टीम मध्ये खुप हुशार मुलं होती.
त्यामध्ये ध्रुव त्रिपाठी जो की एक हुशार हैकर होता , मैत्रीण भूमि सेठ जी खुप हुशार आणि वेगवेगळ्या भाषा शिकणारी मुलगी आणि सार्थकी राव खुप सुंदर आणि हिमती मुलगी होती त्यांच्या मध्ये एक आणखी मुलगा होता जो की त्यांच्यात सगळ्यात मोठी भूमिका पार पाढत होता ती म्हणजे तो खुप श्रीमंत होता , पैशासोबतच त्याचे राजकारणात त्याचे संबंध होते , राज्यातला एक मोठा नेता त्याला सपोर्ट करत होता , तो नेता म्हणजे त्याची मामी उर्जा देवी , या सर्वांना बांधून ठेवणारा मुलगा म्हणजे बंड्या , बंड्या च नाव विराज जोशी होतं.
या मुलांची खाशियत म्हणजे जर यांनी जर एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नसत
आणि आता ही केस ही जिद्दी मूलं सोल्व करणार होते...
ही मूलं केस सोल्व कशी करतील ह्याच विचारत इंस्पेक्टर जाधव होता.
To be continue.......
जर तुम्हाला तुमच्या मराठी कथा , कविता ,वीडियोस आणि तुम्ही तयार केलेले विनोद आणखी काही साहित्य ब्लॉग वर पोस्ट करण्यासाठी मेल करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या मराठी कथा , कविता ,वीडियोस आणि तुम्ही तयार केलेले विनोद आणखी काही साहित्य ब्लॉग वर पोस्ट करण्यासाठी मेल करू शकता.
