हो मी बदललेय...
काल भाजी आणायला गेले होते . लेक होती बरोबर . दोन चार भाज्या एकदम घेतल्या ते सुद्धा निवडलेल्या . भाजीवालीला विचारले किती झाले ग तर म्हणाली 142 रुपये. मी पर्स मधून काढले आणि तिला पैशांबरोबर गोडसे smile देऊन पुढे निघाले .
लेक आश्चर्याने म्हणाली आई.. बरी आहेस ना तू , मी म्हणाले हो का ग? अग एकतर तू सगळ्या निवडलेल्या भाज्या घेतल्यास त्यातून घासाघीस पण केली नाहीस .
तिचा हात हातात घेऊन मी म्हणाले अग हात दुखतात ग भाज्या चिरून आणि तेवढेच चार पैसे जास्त घेऊन घरी जाईल ती भाजीवाली तिच्या .
आम्ही घरीआलो . डायरेक्ट रिक्षा करून . किती झाले .. बापरे 40 . लेक काही बोलणार तोच मी म्हणाले जाऊ दे ग देऊन टाक किती ट्राफिक मधून काढली त्याने रिक्षा . लेक चमत्कारिक नजरेने माझ्याकडे बघत म्हणाली आई बदललीस ग तू. मी मनाशी विचार केला हो खरंच मी बदलतेय.
हल्ली सुट्टीच्या दिवशी मी कपड्यांचा ढीग काढत नाही धुवायला , ना की कपाट आवरायला बसते . मस्त पैकी वाफाळलेली कॉफी घेऊन सोफ्यावर रेलून बसते . पेपर मधल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचून विचलित होत नाही . हो मी बदलतेय ..
साऱ्या जगाला सुधरवण्याचा ठेका काही मी घेतला नाही , मी शोधते कुठे लागलेय प्रशांत दामले चे हलके फुलके नाटक किंवा 'बधाई हो' सारखा movie . व्हाट्सअप्प वरच्या 'yes i am changing' सारख्या पोस्ट मला खुणावतायत. माझ्यात सकारात्मक बदल घडवतयात.
हो मी बदलतेय .. हल्ली माझ्या मैत्रिणींच्या साड्या , ड्रेस मला आवडू लागलेत आणि छान दिसतेस ग असेही म्हणावेे वाटू लागलेय . न जेलस होता. मस्त बारीक झालीयेस ग . मला पण सांग ना तुझे डाएट असे एखादीला विचारताना मला लाज वाटत नाही . हो खरचच मी बदलतेय.
त्यादिवशी तर काही कारणाने राग मनात धरून बसलेल्या माझ्या प्रिय सखीला रस्त्यात दिसल्यावर मी कडकडून मिठीच मारली. मागचे सगळे विसरून तिला ice cream पार्लर मध्ये नेऊन अगदी गारेगार होऊन पाठवले आणि मनातल्या इगो ची जळमटे फेकून हलकी होऊन मीही परतले व्हाट्सअप्प वर तिचा नंबर save करूनच .
मी हल्ली कोणाला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडत नाही ना स्वतःच्या वयाचा फायदा घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते .
ट्रेन मध्ये जाड पुस्तक घेऊन एका पायावर उभ्या असलेल्या कॉलेज कन्येला मीच उभी राहून शांत अभ्यास करायला माझी विंडो सीट देतेय. ना की मोठ्यांना बसायला द्यावे हे व शिकवले नाही का घरच्यांनी असे टोमणे मारतेय . अरेच्या चक्क मी बदलतेय की...
ऑफिस मध्ये कोणी गॉसिप किंवा घाणेरडे राजकारण करत असेल तर मी हल्ली जरा पण चिडत नाही , लेकीच्या भाषेत एकदम cool असते , हो हेच मी बदलल्याचे लक्षण आहे बरका .
झोमॅटो , स्वीगी सगळ्या sites पाठ झाल्यात , अमेझॉन तर माझे favourite झालेय . बिग बझार चे कुर्ते माझ्या वॉकिंग ट्रॅक वर सगळ्यांना आवडतायत. कधीतरी जीन्स वरचे फोटो माझ्या स्टेटस वर अपलोड होतायत .
पण मी बदललेय याचा अर्थ असा नाही की मी उधळलेय . मी पूर्णपणे माझ्या कह्यात आहे . माझा माझ्यावर विश्वास आहे. काही वर्षानंतर मला me too ची गरज लागणार नाही कारण अरे ला कारे आत्ताच म्हणण्याचे सामर्थ्य माझ्यात आलेय .
मी ठरवलंय आता स्वतःवर प्रेम करत जगायचं .आयुष्यातील मंतरलेले क्षण आताच कारणी लावायचे . स्वानंदासाठी . . हो खरंच मी बदललेय , मी पुन्हा एकदा गाणे गुणगुणू लागलेय , आरशात बघून स्वतःलाच छान दिसतेस की अजूनही .. असे म्हणू लागलेय . मी तर आता आनंदी फुलपाखरू झालेय .. पुन्हा एकदा .. नव्याने.
"अपेक्षा"
अपेक्षा तर असणारच..... पण मी त्या स्पष्ट सांगणार नाही..... तू त्या समजून घ्यायला हव्यास..... आणि त्या पूर्णही करायला हव्यास..... जर तू तुझ्याच नादात असलास..... मला काय हवय ते तुझ्या लक्षातही आलं नाही..... तर ती तुझी चूक.....
वेळ निघून गेल्यावर मी तुला बोलून दाखवेनही..... किंवा कदाचित नाहीही..... तुझ्याबद्दलचा एक गैरसमज..... एक अढी..... एक सल मात्र माझ्या मनात कायमचा जपून ठेवीन..... कि तू असाच..... जे मी तुझ्यासाठी केलं..... ते सारं तू विसरलास..... नव्या जगात रमताना तुला माझी आठवणही येत नाही.....
......हो !!! आणखी एक..... तसं तर तुही माझ्यासाठी अनेक गोष्टी केल्यास..... किंवा करतोसही..... पण त्या दिवशी मात्र..... तू असं कसं वागलास......?
त्या एका गोष्टींन मात्र ते सारं पुसलं गेलं..... आता माझं मन फक्त तुझी चूकच उगाळत राहील..... तू केलेल्याअपेक्षाभंगाचं दुःखच कुरवाळत राहील..... अनेक चांगल्या गोष्टी ताशा विसरायलाच होतात नाही का.....? कारण कितीही चांगल्या गोष्टींपेक्षाही एक लहानशी चूकच इतकी प्रभावी असते..... पण हे मी तुला कधीच सांगणार नाही..... माझं दुःख..... माझे समज..... गैरसमज..... सारं काही माझ्यापुरतंच......!
तुला कशाला उगीच दुखवायचं.....??
आणि तसंही स्वतःच्या अपेक्षांचे ओझे घेऊन स्वतःलाच वावरायचे असते नाही का.....???
सहज सुचले म्हणून लिहिले......!!!!! 🙂🙂
जर तुम्हाला देखिल तुमचे साहित्य आपल्या वेबसाइट वर प्रदर्शित करायचे असेल ईमेल द्वारे संपर्क साधावा .
