बिरबलची खिचडी | Akbar birbal Moral stories in Marathi

 बिरबलची खिचडी



एकदा हिवाळ्याच्या दिवशी अकबर आणि बीरबल एका तलावा जवळून  चालत होते. अकबर थांबला आणि गोठवलेल्या पाण्यात आपले बोट ठेवले आणि ताबडतोब तो  म्हणाला , “मला वाटत नाही की या थंड पाण्यात कोणीही एक रात्र टिकु  शकेल”.  अकबरने तलावाच्या थंड पाण्यात उभे राहून जो रात्र काढू शकेल अशा लोकांना एक हजार  सोन्याची नाणी देण्याचे वचन दिले. बीरबल  ने ते आव्हान म्हणून घेतले आणि  लवकरच बीरबलला एक गरीब धोभी सापडला ज्याने एक हजार  सोन्याच्या नाण्यांचे आव्हान स्वीकारण्यास मान्य  केले. दोन शाही रक्षकांच्या संरक्षणाने, त्या गरीब माणसाला  संपूर्ण रात्री गोठवलेल्या पाण्यात उभे केले. सकाळी या बिचारया माणसाला  त्या बक्षीससाठी दरबारात नेण्यात आले. राजाने धोब्याला  विचारले की, तू अतिशीत थंड  पाण्यात उभे राहू शकतो ?, असे विचारले असता त्या माणसाने उत्तर दिले, “स्वामी, मी महालाच्या  एका मशाली  च्या   दिव्याकडे पाहत राहिलो, आणि माझी संपूर्ण रात्र त्याकडे पाहात घालविली.” हे समजल्यावर सम्राट म्हणाला, “हा माणूस बक्षिसास पात्र नाही कारण तो तलावामध्ये उभा राहू शकला कारण त्याला दिव्यामुळे उबदारपणा आला”. त्या बिचारयाचे  हृदय तुटले आणि  तो मदतीसाठी बीरबल कड़े पोहोचला. दुसर्‍या दिवशी बीरबल दरबारात गेला नाही. हे पाहून राजा आश्चर्यचकित झाला. तो आपल्या दरबारासह बीरबलच्या घरी पोहोचला. तेथे त्याला दोन उंच बांबूच्या माथ्यावर हांड्यात तांदूळ लटकलेला दिसला आणि खाली जमिनीवर एक आग जळत होती. सम्राटाने लगेच विचारले, बीरबल, हे काय तमाशा आहे?  “महाराज मी , खिचडी बनवितो आहे ”. अकबर हसू लागला 
एवढ्या अंतरावर ठेवलेल्या हंडीमध्ये खिचडी शिजविली जाईल का ?

नक्कीच शिजावली जाइल महाराज  बीरबल यांनी उत्तर दिले.

कसे? राजाने आतुरतेने विचारले?

महालाच्या  वर जळणारया  दिव्याच्या उष्णतेमुळे धोबी रात्रभर नदीच्या पाण्यात उभा होता तसा जहानपनाह. बीरबल म्हणाला .

बीरबलचे हे तार्किक उत्तर ऐकून सम्राट अकबरला लाज वाटली.

त्याने ताबडतोब धोबी  शोधण्यासाठी शिपयांना पाठवले  व त्याला  बक्षीस देण्याचा आदेश जारी केला.

जेव्हा लोकांना हे कळले तेव्हा "बीरबल ची  खिचडी" एक म्हण म्हणून लोकप्रिय झाली. ज्याचा सहज अर्थ असा आहे की एखादी सोपी कार्य सांगणे किंवा एखादे छोटेसे काम करण्यात जास्त वेळ घालवणे कठीण आहे.

बोध 

आशा लोकांना परिश्रम करण्याची प्रेरणा देऊ शकते.